

UP
esakal
देश: चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील लेकींना सरकारी नोकरीची मोठी भेट दिली आहे. लखनौ येथील लोकभवनमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्यांनी १,२२८ नवनिर्वाचित नर्सिंग ऑफिसर्सना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. विशेष म्हणजे, या महिनाअखेरपासूनच या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार सुरू होणार आहे.