esakal | राहुल-प्रियांका लखीमपूर खेरीला जाणार; यूपी सरकारने दिली परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul and Priyanka Gandhi

राहुल-प्रियांका लखीमपूर खेरीला जाणार; यूपी सरकारने दिली परवानगी

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर घटनेकडे आणि त्यानंतरच्या घटनाक्रमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल होतो आहे. यासंदर्भातच काही वेळापूर्वीच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुला गांधी म्हणाले की, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये होते. मात्र ते लखीमपूर खेरीला गेले नाहीत. तिथे सध्या कलम 144 लागू आहे. मात्र तरीही आम्ही निघतोय. सरकारला जे करायचंय ते त्यांनी करावं. त्यानंतर ते लखीमपूरला जाण्यासाठी निघाले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने आता काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना तीन जणांसमवेत लखीमपूर खेरीला भेट देण्याची परवानगी दिली आहे. ही माहिती उत्तर प्रदेशच्या गृहमंत्रालयाने दिली आहे.

प्रियांका ताब्यात मग अटकेत

लखीमपूर हत्याकांड घटनेनंतर पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना यूपी पोलिसांनी ताब्यात घेऊन एका खोलित नजरकैदेत ठेवलं होतं. तब्बल 30 तासांनंतर त्यांची अधिकृतरित्या अटक करण्यात आली. सध्या त्या अटकेतच आहेत. आता काँग्रेस नेते राहुल गांधी या घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले आहेत. सध्या यूपीमध्ये कलम 144 लागू आहे. मात्र राहुल गांधी छत्तीसगडचे मुख्यमंत्र भुपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासमवेत यूपीला निघालेत.

loading image
go to top