

7th Pay Commission Gift for UP Seed Development Corporation Employees
Sakal
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'उत्तर प्रदेश राज्य बीज विकास निगम' (UP State Seed Development Corporation) च्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली असून त्यांना आता सातव्या वेतन आयोगाचा (7th Pay Commission) लाभ मिळणार आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बीज निगममधील कर्मचाऱ्यांना आता इतर सरकारी विभागांप्रमाणे सातव्या वेतनमानानुसार पगार मिळणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयाच्या फाईलला मंजुरी दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.