PM Narendra Modi : यूपीची 'ही' ग्रामपंचायत कचऱ्यातून छापतेय नोटा; कल्पना झाली हिट; पंतप्रधान मोदींशी आहे कनेक्शन!

UP Gram Panchayat : सुलतानपूरमधील बेहरा भारी गावाची ग्रामपंचायत कचऱ्याचा पुनर्वापर करून उत्पन्न मिळवते आहे. आरआरसी सेंटरमुळे गाव स्वच्छ राहते आणि ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण होते.
Innovative Waste Management in UP Gram Panchayat

Innovative Waste Management in UP Gram Panchayat

Sakal

Updated on

सुलतानपूर : स्वच्छतेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सक्रिय असतात. २ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांनी स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली. या मिशनअंतर्गत जनजागृती अभियानापासून अनेक योजना-परियोजना आणल्या गेल्या, ज्या आजही प्रत्यक्षात काम करत आहेत. याच योजनांपैकी एक योजना ग्रामपंचायतीला कचरामुक्त करणे आणि त्या कचऱ्यातून स्वच्छता करून उत्पन्नाचे साधन निर्माण करणे, ही होती. यासाठी ग्रामपंचायतींना आरआरसी सेंटर (RRC Center - Resource Recovery Center) देण्यात आले. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील अशीच एक ग्रामपंचायत आहे, जिथे ग्रामप्रमुखांच्या कल्पकतेमुळे ग्रामपंचायत आत्मनिर्भर झाली आहे. येथे गावातील कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया (Recycle) केली जाते, ज्यामुळे ग्रामपंचायतीला कमाई होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com