

up education mega bharti.
esakal
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाने शिक्षण विभागातील एकूण १७,०५९ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उच्च शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण विभागातील विविध पदांचा या भरतीत समावेश आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ मध्ये विविध पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी एक लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील भरतीकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. आयोगाचे अध्यक्ष प्रशांत कुमार यांनी भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला आहे.