

UP
esakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'विकसित उत्तर प्रदेश@2047' अंतर्गत राज्याला जगाची 'आध्यात्मिक आणि सांस्कृतिक राजधानी' बनवण्याचा महाकाय आराखडा (Roadmap) सादर केला आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि काशी विश्वनाथ धामच्या कायापालटानंतर आता युपी सरकार ६ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी पर्यटनाला मुख्य आधार बनवत आहे.
पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या या रोडमॅपमध्ये पर्यटकांची संख्या वाढवण्यासोबतच त्यांच्या राहण्याच्या सोयीसुविधा जागतिक दर्जाच्या करण्यावर भर दिला आहे.