

Loan
esakal
उत्तर प्रदेशातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास योजने'चा मोठा आधार मिळत आहे. मात्र, आता राज्य सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. नव्या निर्णयानुसार, आता कोणत्याही उमेदवाराला कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी केवळ ऑनलाइन अर्ज करणे पुरेसे ठरणार नाही, तर त्याला ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जोपर्यंत उमेदवार प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सादर करत नाही, तोपर्यंत बँक कर्जाची रक्कम खात्यात वर्ग करणार नाही.