UPSC च्या स्थगित झालेल्या परीक्षेची तारीख जाहीर, या तारखेला होणार पेपर

upsc
upsc

नवी दिल्ली, ता. 05 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षा 2020 ची तारीख जाहीर केली आहे. आयोगाने upsc.gov.in या संकेतस्थळावर याची माहिती दिली आहे. यावेळी परीक्षेसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या जवळपास दहा लाख इतकी असू शकते. ही परीक्षा आधी 31 मे रोजी होणार होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आली होती.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात शुक्रवारी (५ जून) आयोगाची बैठक झाली. यामध्ये तारीख निश्चित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. 4 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणार आहे.

 परीक्षेसाठी दोन पेपर असतात. दोन्ही पेपर देणं बंधनकारक असतं. प्रत्येक पेपर 200 गुणांचा असतो. पूर्व परीक्षा एकूण 400 गुणांची असते.  पूर्व परीक्षेचे दोन्ही पेपर्समध्ये ऑब्जेक्टीव्ह टाइप प्रश्न विचारले जातात. एका पेपरसाठी दोन तासांचा वेळ मिळतो. यात जनरल स्टडीज पेपर 1 आणि पेपर 2 असतात. यातील पेपर 2 हा पात्रता ठरवतो. या पेपरमध्ये किमान 33 गुण मिळणे आवश्यक असतं.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com