
UPSC 2021 चा निकाल जाहीर, यंदा मुली अव्वल
UPSC Civil Service final result 2021 declared
UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिल्या तीन टॉपर्स मुली आहेत. यामध्ये श्रुती शर्माने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, द्वितीय अंकिता अग्रवाल आणि तृतीय क्रमांकांवर गामिनी सिंगला आहेत. (Shruti Sharma Holds First Rank in UPSC 2021)
अंतिम निकाल लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल. यंदा एकूण 685 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. (UPSC 2021 Results How to Check)
श्रुती शर्मा सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (JNU) माजी विद्यार्थिनी आहे. ती जामिया इस्लामिया कोचिंग अकादमीमध्ये UPSC परीक्षेची तयारी करत होती.
UPSC CSE प्रीलिम्स 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. त्याचा निकाल 29 ऑक्टोबरला जाहीर झाला. मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला. यानंतर 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या मुलाखतींनंतर आज निकाल जाहीर झाला आहे.
यावर्षी परीक्षा ५ जूनला पार पडणार
या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षा 5 जून रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी UPSC ने उमेदवारांना OMR शीट कशी भरायची ते सांगितलंय. यूपीएससीनं OMR शीटच्या प्रतिमा (फोटो) शेअर करून उमेदवारांना अर्ज भरण्याचा योग्य आणि चुकीचा मार्ग समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी वेबसाइटला भेट द्यावी आणि संपूर्ण तपशील तपासावा, असंही आवाहन त्यांनी केलंय.
Web Title: Upsc Exam 2021 Result Declared On Government Website
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..