Facebook Live : तुझ्यासाठी मी मरणही पत्करेन...

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

फेसबुकवरून शेवटच्या क्षणांचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केले. आत्हत्याकरण्यापूर्वी त्याने प्रेमात झालेल्या फसवणुकीची माहिती दिली.

नवी दिल्लीः प्रेमात अपयश आल्यानंतर एकाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. तब्बल दोन तास फेसबुकवरून लाईव्ह सुरू होते. दरम्यानच्या काळात त्याला थांबवले असते तर जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया पुढे येत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेहरोर (अलवर, राजस्थान) येथे राहणाऱया निर्मल कुमावत (वय 20) याचे पूर्वीच्या मैत्रीणीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. यावेळी त्याने तुझ्यासाठी मी मरणही पत्करेन असे म्हणून फेसबुक लाईव्ह सुरू केले व सोमवारी (ता. 17) रात्री आत्महत्या केली. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

निर्मलने आयुष्य संपवताना फेसबुकवरून शेवटच्या क्षणांचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केले. आत्हत्याकरण्यापूर्वी त्याने प्रेमात झालेल्या फसवणुकीची माहिती दिली. प्रेमात झालेल्या फसवणुकीबद्दल तो खूप वेळ बोलला. त्यानंतर आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले. तब्बल दोन तास चालेल्या प्रकारानंतर त्याने गोळया खालल्या व गळफास घेऊन आत्महत्या केली. अनेकांनी या आत्महत्येचे लाईव्ह स्ट्रीमिंगही पाहिले व पोलिसांनीही सांगितले. बेहरोर पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत त्याने जगाचा निरोप घेतला होता.

दरम्यान, निर्मल टोकाचे पाऊल उचलत असताना कोणीही त्याचा प्राण वाचवू शकले नाही. नेटिझन्सनी प्रतिक्रियांमधून भावना व्यक्त करताना थांबविण्याचा प्रयत्न केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Upset over failed love man live streams suicide on Facebook