Urban Growth Conclave 2.0: नागरी विकासासाठी दोन नव्या धोरणांचे मसुदे सादर होणार

Urban Growth Conclave 2.0 : मध्य प्रदेशातील इंदूर येथे २८ ऑक्टोबरला अर्बन ग्रोथ कॉन्क्लेव २.० आयोजित करण्यात आले आहे. परिषदेत परवडणारी घरे आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापरासंदर्भातील दोन धोरणांचे मसुदे सादर होणार आहेत.
Madhya Pradesh is presenting new urban policy drafts and infrastructure investment opportunities at Urban Growth Conclave 2.0 in Indore.

Madhya Pradesh is presenting new urban policy drafts and infrastructure investment opportunities at Urban Growth Conclave 2.0 in Indore.

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील नागरी पायाभूत सुविधांचा विकास, परवडणाऱ्या घरांची उपलब्धता आणि पाण्याचा पुनर्वापर यांवर भर देण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी इंदूर येथील ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘अर्बन ग्रोथ कॉन्क्लेव २.०’चे आयोजन करण्यात आले आहे. मध्य प्रदेश शासनाच्या नगरविकास व गृहनिर्माण विभागातर्फे आयोजित या परिषदेत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली विविध नागरी विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. यासोबतच दोन महत्त्वाच्या धोरणांच्या मसुद्यांचे विमोचन आणि आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ‘इंदूर इकॉनॉमिक रिजन’च्या विकास आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com