
वॉशिंग्टन : कोरोनाच्या साथीमुळे सर्व जगाचे आरोग्य, अर्थव्यवस्था डळमळीत झाली. हा विषाणू चीनमधील प्रयोगशाळेत तयार केला असल्याचा संशय अमेरिकेने वेळोवेळी व्यक्त केला आहे. आता कोरोनासारखीच दुसरी जागतिक साथ रोखण्यासाठी अशा विषाणूंची निर्मिती रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि इराणमधील जैववैद्यकीय संशोधनासाठी मध्यवर्ती निधी थांबविण्याच्या निर्णय घेतला आहे.