चीनच्या रॉकेटचे अवशेष पृथ्वीवर कुठे आणि कधी कोसळणार?; अमेरिकन मिलिटरीनं केलं भाकीत

चीनचं ५-बी रॉकेट पृथ्वीवर रहिवासी भागात कोसळणार असल्याच्या चर्चा दोन दिवसांपासून सुरु आहेत.
Rocket Launch
Rocket Launch

नवी दिल्ली : अवकाशात निष्क्रिय आणि अनियंत्रित झालेलं चीनचं ५-बी (Chinese rocket 5B) रॉकेट पृथ्वीवर गर्दीच्या रहिवासी भागात कोसळणार असल्याच्या चर्चा दोन दिवसांपासून सुरु आहेत. पण या रॉकेटचे अवशेष (debris) पृथ्वीवर कुठे आणि कधी कोसळेल याबाबत अमेरिकन मिलिटरीने (American Military) भाकीत केलं आहे. (US military predicts time place of Chinese rocket debris crash on Earth)

Rocket Launch
कोविड रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज नाही; केंद्राचं नवं धोरण

चीनने २८ एप्रिलला तियानहे स्पेस स्टेशन (Tianhe Space Station) बनवण्यासाठी सगळ्यात मोठे रॉकेट ५बी अवकाशात सोडले होते. एक मॉड्यूल घेऊन हे रॉकेट स्पेस स्टेशनमध्ये गेले. मॉड्यूलला निर्धारित कक्षेत सोडण्यात आल्यानंतर याला नियंत्रित पद्धतीने जमिनीवर यायचं होतं. पण, चीनच्या स्पेस एजेन्सीचं या रॉकेटवरील नियंत्रण सुटले आहे. शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केलीये, की हे रॉकेट कधी जमिनीवर कोसळेल सांगता येत नाही. शिवाय रहिवाशी भागात हे रॉकेट पडण्याची शक्यता आहे. रॉकेटची गती लक्षात घेता यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. १० मेपर्यंत रॉकेट जमिनीवर पडेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता.

कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी कोसळणार रॉकेट?

दरम्यान, अमेरिकेची मिलिटरी या रॉकेटच्या पृथ्वीवर येणाऱ्या भागाला ट्रॅक करत आहे. त्यानुसार त्यांनी हे रॉकेट कुठे कोसळेल याबाबत भाकीत केलं आहे. अमेरिकन मिलिटरीनं म्हटलंय की, "या रॉकेटचे अवशेष मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानमध्ये स्थानिकवेळेनुसार शनिवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कोसळेल. (भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी, पहाटे ४.३० वाजता कोसळेल)" सीएनएनने याबाबत वृत्त दिलं आहे.

Rocket Launch
DRDOच्या 2-DG कोरोना प्रतिबंधक औषधाला DGCIची परवानगी

या कोसळणाऱ्या रॉकेटबाबत हॉवर्ड विद्यापीठातील अॅस्ट्रोफिजिस्ट जोनाथन मॅकडोवेल म्हणाले, "ज्या भागात हे रॉकेट कोसळेल त्या भागाला मोठं नुकसानं होऊ शकतं. चीनचं एखादं रॉकेट पृथ्वीवर कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२०मध्ये दुसऱ्या एका लॉंग मार्च रॉकेटचे अवशेष पश्चिम अफ्रिकन देशातील आयव्हरी कोस्ट येथील गावांमध्ये कोसळलं होतं. यामुळे या ठिकाणी मोठं नुकसानं झालं होतं. पण यामुळे कोणतीही व्यक्ती जखमी किंवा कोणाचाही मृत्यू झाला नव्हता."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com