esakal | पाकिस्तान ते अमेरिका; कोरोना संकटात अनेक देश भारताच्या मदतीला

बोलून बातमी शोधा

narendra modi

जगभरातील देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तान, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी भारताला सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.

पाकिस्तान ते अमेरिका; कोरोना संकटात अनेक देश भारताच्या मदतीला
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली- देशात कोरोनाचे संकट गंभीर बनले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी देशात जवळपास साडेतीन लाख कोरोना रुग्ण आढळून आहे आहेl. गेल्या सलग चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे आढळून येत आहे. देशात आरोग्यसेवा कमी पडू लागल्या आहे, ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशात जगभरातील देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तान, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी भारताला सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीयन यांनी यासंबंधी ट्विट केलंय. ''भारतातील कोरोना उद्रेकाची अमेरिकेने दखल घेतली आहे. कोरोना काळात विषाणूविरोधात लढण्यासाठी महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा केला जाईल''. भारतीय वशांचे अमेरिकन काँग्रेसमन राजा क्रिश्नमूर्ती यांनी अमेरिकीचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना विनंती केलीये की ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनेकाची लस भारताला पुरवावी. सध्या अमेरिकीत 4 कोटी डोस पडून आहेत. त्यामुळे या लशींचा पुरवठा गरजू देशांना करावा, असंही ते म्हणाले आहेत.

फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीयन यूनियनही भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पुढे आले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यनुएल मॅक्रॉन म्हणाले की, फ्रान्स भारताच्या मदतीसाठी नक्की उभा राहील. फ्रान्सचे राजदूत इम्यनुएल लेनेनं यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ''संकटामध्ये आम्ही भारतासोबत आहोत आणि त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे.''

युरोपीयन युनियननेही मदतीची तयार दाखवली आहे. ऑस्ट्रलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताने कोरोना काळात केलेल्या मदतीचा उल्लेख करतानाच मदतीचे आश्वासन दिलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही कोरोना लढ्यात भारतासोबत असल्याचं म्हटलंय. मानव जातीसमोर असलेल्या संकटात आम्ही सर्वजण एकत्र आहोत. या काळात आम्ही भारतासोबत खंभीरपणे उभे आहोत, असं ते म्हणाले आहेत.