‘भविष्यातील युद्धात स्वदेशी शस्त्रांचा वापर’ - बिपीन रावत

पीटीआय
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पैसा जागतिक राजकारणाची दिशा ठरवितात. या दोन गोष्टींमधील सामर्थ्यावरच देशाचा विजय अवलंबून असतो.
- अजित दोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

नवी दिल्ली - ‘भविष्यातील युद्धात भारत स्वदेशी शस्त्रांचा वापर करेल आणि विजयही मिळवेल,’’ असा विश्‍वास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी व्यक्त केला.

लष्करी संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडी) ४१ व्या संचालक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. सायबर, अवकाश, लेसर, इलेक्‍ट्रॉनिक आणि रोबोटिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा विकास करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत, असे लष्कर 
प्रमुखांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The use of indigenous weapons in future wars bipin rawal