गाडी चालवताना मोबाईल वापरला तर होणार १०हजारांचा दंड

अशोक गव्हाणे
शुक्रवार, 31 जुलै 2020

उत्तर प्रदेशात अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून या गोष्टींना आळा घालण्यासाठी उत्तरप्रेदश सरकार काही कठोर निर्णय घेत आहे. यामधे दुचाकीवर मोबाईल वापरताना सापडल्यास १० हजार रुपयांचा दंड होणार आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून या गोष्टींना आळा घालण्यासाठी उत्तरप्रेदश सरकार काही कठोर निर्णय घेत आहे. यामधे दुचाकीवर मोबाईल वापरताना सापडल्यास १० हजार रुपयांचा दंड होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रस्त्यांवरील अपघात हे उत्तरप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असून त्यासाठी ड्रायव्हिंग करत असताना मोबाईल वापरणे हे धोकादायक ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. काल (ता. ३०) गुरुवारी याबाबत सरकारने हा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारच्या या आदेशानुसार दुचाकी आणि चारचाकी चालवताना चालकाने मोबाईल वापरल्याचे आढळून आल्यास त्याला दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. जूनमध्ये हा आदेश जारी करण्यात आला होता, त्याची अधिसूचना काल जारी केली आहे. 

यासोबतच आणखी काही बदल करण्यात आले असून पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पाचशे रुपये दंड करण्यात येणार आहे. त्याचसोबत पार्किंगच्या नियमांचे तिसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना तिप्पट दंड आकारणी होणार असून त्यांच्याकडून १५०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच, १२ महिन्यांपेक्षा अधिक काळ दुसऱ्या राज्यांच्या चिन्हांचा वापर केल्यास पहिल्यावेळी पाचशे रुपये तर दुसऱ्यावेळी १५०० रुपये दंड होणार असून दुसऱ्या व्यक्तीच्या ड्रायव्हिंग परवान्याचा वापर केल्यास किंवा ड्रायव्हिंग परवाना नसताना वाहन चालवल्यास पहिल्यांदा पाचशे रुपये तर दुसऱ्यावेळी १५०० रुपये दंड आकारण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Using mobile phones while driving will attract ₹10,000 penalty in UP