उ. बिस्मिल्लाह खान यांच्या पाच शहनाईंची चोरी

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

वाराणसी - भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या पाच शहनाई वाराणसी येथील त्यांच्या घरातून चोरी झाल्या आहेत. त्यातील एक शहनाई बिस्मिल्लाह खान यांची आवडती शहनाई असल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.

उत्साद बिस्मिल्लाह खान यांचा मुलगा काझीम हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (रविवार) रात्री आपल्या जून्या घरी आले असता, त्यांना दाराचे कुलुप तुटलेले अढळले. आणि घरात बघितले असता शहनाईंची चोरी झाल्याचे त्यांना कळाले. त्यानंतर त्यांनी पोलिसात याविषयी तक्रार नोंदविली.

चोरी झालेल्या शहनाईंपैकी एक शहनाई चांदिची असून, बाकीच्या लाकडी शहनाई असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. या शहनाईंपैकी बिस्मिल्लाह खान यांची आवडती शहनाई त्यांना माजी पंतप्रधान पी. व्हि नरसिंहराव यांनी भेट दिली होती. 

Web Title: Ustad Bismillah Khan's shehnais stolen