Ustad Zakir Hussain: सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावली; अमेरिकेत उपचार सुरु

उस्ताद झाकीर हुसेन तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक म्हणून परिचित आहेत. तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांचे ते सर्वात मोठे पुत्र. ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. झाकीर हुसेन यांचे बालपण आणि शिक्षण माहीममध्ये झाले. साहजिकच त्यांची संगीत साधना आणि पुढील सफरही माहीममधूनच सुरू झाली.
Ustad Zakir Hussain: सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावली; अमेरिकेत उपचार सुरु
Updated on

Ustad Zakir Hussain Health: सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com