UP Anganwadi Workers Salary Hike : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड! मानधनवाढीसह आता वर्षाला मिळणार ३ साड्या आणि स्मार्टफोन

UP Anganwadi Workers Salary Hike : दिवाळीनिमित्त उत्तर प्रदेश सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ केली आहे. याशिवाय वर्षाला तीन साड्या, स्मार्टफोन आणि पाच लाखांपर्यंत कॅशलेस उपचारांची सुविधाही मिळणार आहे
UP Anganwadi Workers Salary Hike

UP Anganwadi Workers Salary Hike

sakal

Updated on: 

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविकांचे मानधन दरमहा ८ हजार रुपयांवरून १२ हजार रुपये, तर मदतनिसांचे मानधन ४ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये करण्यात आले आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे ३.४६ लाख महिला कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे.

मानधनवाढीबरोबरच अंगणवाडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतच्या कॅशलेस उपचारांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वर्षाला दोनऐवजी तीन साड्या देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अंगणवाड्यांच्या कामकाजासाठी १.९३ लाखांहून अधिक स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव लीना जौहरी यांनी या निर्णयांची माहिती दिली.

Loading content, please wait...