उत्तर प्रदेश : मायवतींचा निवडणूक न लढण्याचा निर्णय; कोणाच्या फायद्याचा?

Mayawati
Mayawatiesakal
Summary

उत्तर प्रदेशचं चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या मायावती यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) निवडणुकीचा रणसंग्राम १० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ७ टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचा हा रणसंग्राम जवळपास महिनाभर सुरु असले. दरम्यान, यात आता उत्तर प्रदेशचं चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या बसपाच्या (BSP) सर्वेसर्वा मायावती (Mayawati) यांनी मोठी घोषणा केली आहे. मायावती या प्रचारात उतरणार नसून त्यांनी निवडणूकसुद्धा लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस सतिश चंद्र मिश्रा हे देखील निवडणूक लढवणार नाहीत. याची माहिती स्वत: मिश्रा यांनी दिली आहे.

सतिश मिश्रा यांनी म्हटलं की, माजी मुख्यंमंत्री आणि मी निवडणूक लढवणार नाही. मात्र तरीही आम्ही उत्तर प्रदेशात बसपचे सरकार परत आणू असा दावाही त्यांनी केला. एका बाजुला समाजवादी पक्षाने ४०० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. यावर सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, 'समाजवादी पक्षाजवळ तर ४०० उमेदवारच नाहीत तर ते इतक्या जागा कशा जिंकणार, सपा किंवा भाजपा सत्तेत येणार नाहीत. यावेळी बसपा सरकार स्थापन करेल.'

Mayawati
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राजधानीत

गेल्या काही दिवसांपासून सतीश चंद्र मिश्रा हे एकटेच प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. अवधपासून पूर्वांचल आणि पश्चिम उत्तर प्रदेश त्यांनी पिंजून काढला आहे. ब्राह्मण वर्गाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी अनेक प्रोग्रॅम आयोजित केले. मात्र दुसऱ्या बाजुला मायावती मात्र ना रॅलीत दिसल्या ना रोड शोमध्ये. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात मायावतींनी निवडणूक न लढवणं हे कोणाच्या पथ्यावर पडणार हे पहावं लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com