esakal | अयोध्येत शरयू नदीला पूर; गावांमध्ये शिरलं पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

uttar pradesh ayodhya district flood situation sarayu river

आयोध्येच्या रुदौली या तालुक्यातील अनेक गावं पुरात बुडाली आहेत. शरयू नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं इथं पूर परस्थिती निर्माण झाली आहे. याभागात पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे.

अयोध्येत शरयू नदीला पूर; गावांमध्ये शिरलं पाणी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अयोध्या Ayodhya Flood :  नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रत्येक पावसाळ्यात पूरपरिस्थती निर्माण होत आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या राज्यांची असणारी भौगोलिक रचना. कारण हिमालयातून येणाऱ्या शकडो नद्या या राज्यातून जातात. आताही उत्तरप्रदेश (Uttar Pradesh Flood) आणि बिहारमध्ये (Bihar Flood) मोठा पूर आला आहे. शरयू (Sharayu River Flood) नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे आयोध्येच्या आसपास मोठा पूर आला आहे.

आयोध्येच्या रुदौली या तालुक्यातील अनेक गावं पुरात बुडाली आहेत. शरयू नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं इथं पूर परस्थिती निर्माण झाली आहे. याभागात पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांना त्यांची घरे सोडून इतर ठिकाणी रहायला जावं लागलं आहे. तसेच या पुरात शेतकऱ्यांची पीकं पुरामुळे बुडाली असून, मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील इतर नद्यांचीही पाण्याची पातळी वाढल्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

दक्षिण-पूर्व उत्तरप्रदेश आणि ईशान्य मध्यप्रदेशात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे उत्तरप्रदेशात मोठा पाऊस पडत आहे. या चक्रीवादळामुळे पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिणपूर्व उत्तरप्रदेशात पोहोचले आहे. आज संध्याकाळपासून उद्या सकाळपर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. 'आम्ही सध्या खूप अडचणीत सापडलो आहोत, या पुरात आमचं मोठं नुकसान झालं आहे.' अशी प्रतिक्रिया रुदौली तालुक्यातील स्थानिक लोकांनी दिली आहे. सुमारे 1500 लोकांना शरयू नदीला पूर आल्यामूळे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. सध्या बिहारमध्येही नद्यांना पूर आल्यामूळे मोठा पूर आला आहे.