Yogi Adityanath : आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; ‘यूपी’त पोटनिवडणुकीत नऊपैकी सात जागांवर भाजपचा विजय

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित ‘एनडीए’ला ८० पैकी ३६ व भाजपला ३३ जागा मिळाल्याने बॅकफूटवर गेलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोटनिवडणुकीतील विजयामुळे मोठा दिलासा मिळाला.
Yogi Adityanath
Yogi Adityanathsakal
Updated on

लखनौ - लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित ‘एनडीए’ला ८० पैकी ३६ व भाजपला ३३ जागा मिळाल्याने बॅकफूटवर गेलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पोटनिवडणुकीतील विजयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील नऊपैकी सात विधानसभा मतदारसंघांत भाजपने विजय मिळविला. समाजवादी पक्षाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे आदित्यनाथ यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com