esakal | योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा; मजुरांना देणार एवढे पैसे
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath

योगी आदित्यनाथ यांनी आज पत्रकार परिषद घेत दररोज वेतनदारीवर असलेल्या सुमारे 15 लाख मजुरांना आणि बांधकाम साईट्सवर काम करणाऱ्या सुमारे 20 लाख मजुरांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची घोषणा केली.

योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा; मजुरांना देणार एवढे पैसे

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने मजुरांची मोठी अडचण होत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (शनिवार) मोठी घोषणा करत प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील 35 लाख मजुरांना प्रत्येकी 1 हजार रुपये देण्यात येणार आहे.

योगी आदित्यनाथ यांनी आज पत्रकार परिषद घेत दररोज वेतनदारीवर असलेल्या सुमारे 15 लाख मजुरांना आणि बांधकाम साईट्सवर काम करणाऱ्या सुमारे 20 लाख मजुरांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची घोषणा केली. यामुळे या नागरिकांना मदत होणार आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाचा संसर्ग झाल्याचा 23 जण समोर आले आहेत. या सर्वांवर उपचार सुरु असून, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

आदित्यनाथ म्हणाले, की मजुरांनी दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आवश्यक पैशांचे वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेल्या जनता कर्फ्यूमुळे उद्या (रविवार) सर्व मेट्रो, रेल्वे, बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोनाच्या भीतीमुळे घाबरून जाऊ नये. राज्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. 

loading image