esakal | भविष्यात कोणी हिंमत करणार नाही अशी शिक्षा देऊ; हाथरस प्रकरणावर योगींची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi_20Adityanath

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे

भविष्यात कोणी हिंमत करणार नाही अशी शिक्षा देऊ; हाथरस प्रकरणावर योगींची प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी त्यांनी बलात्काऱ्यांना चेतावणी देत आई-बहिणींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला धक्का लावणाऱ्यांचा संपूर्ण नाश करण्यात येईल असं म्हटलं आहे. 

कृषी कायद्याविरोधात आंदोलन,माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांना अटक

कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत विरोधकांनी मुख्यमंत्री योगी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यानंतर पहिल्यांदाच योगी यांनी यावर भाष्य केलं आहे. उत्तर प्रदेशातील आई-बहिणींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला धक्का लावू पाहणाऱ्यांचा समुळ नाश केला जाईल. त्यांना अशी कठोर शिक्षा दिली जाईल, जे भविष्यात उदाहरण बनेल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक महिलेच्या सुरक्षा आणि विकासाच्या हेतूसाठी संकल्पबद्ध आहे आणि आमचं हे वचन आहे, असं योगी म्हणाले आहेत.  

उत्तर प्रदेशातील हाथरस सामुहिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. पीडीतेच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट समोर आला आहे. सफदरजंग हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पीडीतेचे पोस्टमार्टर केलं आहे. त्यांनी या पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, पीडीतेचा मृत्यू गळ्याचे हाड तुटल्याने झाला आहे. रिपोर्टमध्ये म्हटलंय की वारंवार गळा दाबल्याने पीडीतेच्या गळ्याचे हाड तुटले होते. गळ्यावर याचे खूणाही मिळाल्या आहेत. मात्र, रिपोर्टमध्ये बलात्काराचा उल्लेख नाहीये. 

भारतीयांना दिलासा देत ट्रम्प यांना न्यायालयाचा दणका

पोलिस अधिक्षकांनी सांगितलं आहे की, 'पीडित मुलीला अलीगढच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालात पीडितेच्या शरीरावर जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, पण जबरदस्तीने शररसंबंधांची केला असल्याचं मात्र खात्रीशीर सांगता येत नाही असं म्हटलं आहे.'

एसआयटीद्वारे तपास

या पीडीतेच्या मृत्यूनंतर उसळलेला जनक्षोभ पाहता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय एसआयटी नियुक्त केली आहे. तसेच या प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा देण्याच्या सुचना दिल्या आहेत.