Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पदभार सोहळ्यातच उफाळला अंतर्गत कलह; अजय राय आणि ममता चौधरींच्या समर्थकांमध्ये जुंपली
Clash at Uttar Pradesh Congress Office, Chappals Thrown at Leaders

Clash at Uttar Pradesh Congress Office, Chappals Thrown at Leaders

Sakal

Updated on: 

लखनौ : उत्तर प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षांतर्गत गटबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पदभार स्वीकार कार्यक्रमादरम्यानच माजी प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि पक्षाच्या नेत्या ममता चौधरी यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत चक्क पायातील चपला आणि बूट एकमेकांवर भिरकावले. भर कार्यालयात झालेल्या या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com