Uttar Pradesh: दिव्यांग नवविवाहित जोडप्यांना १५ ते ३५ हजार रुपयांचे प्रोत्साहन; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

Incentives Range from ₹15,000 to ₹35,000: उत्तर प्रदेश सरकारच्या विवाह प्रोत्साहन योजनेत पात्र दिव्यांग नवविवाहित जोडप्यांना १५ ते ३५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. पात्र जोडप्यांना ऑनलाइन अर्ज करून कागदपत्रे जिल्हा कार्यालयात जमा करावी लागतील
Uttar Pradesh offers financial incentives to eligible newlywed couples under its Divyang marriage promotion scheme.

Uttar Pradesh offers financial incentives to eligible newlywed couples under its Divyang marriage promotion scheme.

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेश : दिव्यांग व्यक्तींना वैवाहिक जीवनात आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाकडून 'दिव्यांगजन शादी-विवाह प्रोत्साहन पुरस्कार योजना' राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र नवविवाहित जोडप्यांना १५ हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन निधी दिला जातो. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

प्रयागराजचे जिल्हा दिव्यांगजन सक्षमीकरण अधिकारी अशोक कुमार गौतम यांनी योजनेची माहिती दिली. जोडप्यातील कोणती व्यक्ती दिव्यांग आहे, यानुसार प्रोत्साहन निधीची रक्कम निश्चित केली जाते.

Loading content, please wait...