Uttar Pradesh Government : योगी सरकारची दिवाळी भेट; उज्ज्वला योजनेतील १.८९ कोटी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर

UP Free LPG Cylinder Scheme : दिवाळीनिमित्त उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या १.८९ कोटी लाभार्थी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर रिफिलचा लाभ मिळणार आहे. योगी सरकारने यासाठी १,५०० कोटी रुपयांहून अधिक अनुदान वितरित केले आहे.
UP Free LPG Cylinder Scheme

UP Free LPG Cylinder Scheme

sakal 

Updated on: 

उत्तर प्रदेश : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील १ कोटी ८९ लाख लाभार्थी कुटुंबांसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे गॅस सिलिंडर रिफिल अनुदान वितरित केले. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना दिवाळीसाठी गॅस सिलिंडर भरून घेण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागणार नसल्याचा सरकारचा दावा आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त सिलिंडरच्या उर्वरित किमतीचा भार उत्तर प्रदेश सरकार उचलणार आहे. ही रक्कम थेट गॅस कंपन्यांना दिली जाणार असल्याने लाभार्थ्यांना सिलिंडरच्या रिफिलसाठी पैसे भरावे लागणार नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories