Uttar Pradesh: रुग्णांची रुग्णालयांतील धावपळ थांबणार; उत्तर प्रदेशात १६ नोव्हेंबरपासून ‘ई-सारथी’ पोर्टल सुरू

UP e-Sarathi Hospital Portal : उत्तर प्रदेशात १६ नोव्हेंबरपासून ई-सारथी पोर्टल सुरू होणार आहे. रुग्णालयांतील रिकामे बेड आणि उपचार सुविधांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार असल्याने रुग्णांची धावपळ कमी होण्याची अपेक्षा आहे.
Uttar Pradesh to launch e-Sarathi portal for hospital bed availability.

Uttar Pradesh to launch e-Sarathi portal for hospital bed availability.

esakal

Updated on: 

लखनौ : रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळावेत आणि एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्याची धावपळ कमी व्हावी, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ‘ई-सारथी पोर्टल’ विकसित केले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचा शुभारंभ १६ नोव्हेंबरपासून सैफई येथे होणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून रुग्णालयांमधील रिकामे बेड आणि उपलब्ध वैद्यकीय सुविधांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.

या प्रणालीशी जोडलेल्या रुग्णालयांना दर दोन तासांनी रिकाम्या बेड्सची संख्या आणि उपलब्ध उपचार सुविधांची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक असेल. त्यामुळे रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यापूर्वीच तेथे बेड उपलब्ध आहे का आणि आवश्यक उपचारांची सुविधा आहे का, याची माहिती डॉक्टरांना मिळू शकेल.

Loading content, please wait...