

UP Sets Tourism Record in 2025; Religious Tourism Fuels Massive Footfall
esakal
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्याचे पर्यटन मंत्री जयवीर सिंह यांनी 'उत्तर प्रदेश मॉडेल'च्या यशाची आकडेवारी सादर केली आहे. एकेकाळी गुन्हेगारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशने आता 'टेंपल इकॉनॉमी' (मंदिर अर्थव्यवस्था) आणि पर्यटनाच्या जोरावर देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.