Healthcare: शिक्षक, पीआरडी जवान, अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा; कुटुंबासह मिळणार ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

शिक्षक, पीआरडी जवान, स्वयंपाकी भगिनी व अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दरवर्षी ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; मानधनवाढीमुळेही आर्थिक दिलासा
Teachers, PRD, Anganwadi Workers Get ₹5 Lakh Health Cover

Teachers, PRD, Anganwadi Workers Get ₹5 Lakh Health Cover

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील शिक्षक, प्रांतीय रक्षक दलाचे जवान, शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या स्वयंपाकी भगिनी तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व घटकांना आता त्यांच्या कुटुंबीयांसह दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळणार आहे. गंभीर आजारांवरील उपचारासाठी कर्ज काढण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकारने ही आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

उच्च शिक्षण विभागांतर्गत विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालये तसेच विनाअनुदानित अभ्यासक्रमांमध्ये काम करणाऱ्या १ लाख २८ हजारांहून अधिक शिक्षकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. ‘मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस वैद्यकीय सुविधा योजने’अंतर्गत शिक्षक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना सूचीबद्ध सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com