

ODOP Scheme
esakal
आधुनिक यंत्रसामग्रीच्या युगात उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील पहाडपूर कलां हे गाव आजही पारंपरिक हस्तकलेचा वारसा जपताना दिसते. येथे कारखान्यांचा गोंगाट नाही किंवा मोठ्या यंत्रांचा वापरही होत नाही. जूटच्या धाग्यांपासून हाताने तयार होणाऱ्या आकर्षक भित्ती-सजावटीच्या कलाकृतींनी या गावाला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. या कलेला २०१८ मध्ये भौगोलिक मानांकन (जीआय टॅग - GI No. 314) मिळाले. त्यामुळे या हस्तकलेची अस्सल ओळख जपली गेली असून कारागिरांच्या हक्कांनाही संरक्षण मिळाले आहे.