

Fish Conservation Drive in Uttar Pradesh 50000 Fish Fingerlings Released into Gomti River to Improve Aquatic Biodiversity
esakal
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील गोमती नदीत ‘रिव्हर रँचिंग’ उपक्रमांतर्गत ५० हजार माशांची पिल्ले सोडण्यात आली. नदीतील स्थानिक माशांच्या प्रजातींचे संवर्धन करणे, जल परिसंस्थेचे संतुलन राखणे आणि पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेला बळ देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री डॉ. संजय कुमार निषाद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.