Uttar Pradesh News : टाटा मोटर्ससह २२ कंपन्या रोजगारासाठी आल्या, तरी तरुणांची पाठ; ३४३ जणांना मिळाली नोकरी

Job Fair in Uttar Pradesh : कानपूरमधील रोजगार मेळाव्यात टाटा मोटर्ससह २२ कंपन्यांनी २,०३९ पदांसाठी संधी दिली; मात्र ५७६ उमेदवारच सहभागी झाले. त्यापैकी ३४३ जणांची निवड झाली, तर प्रयागराजमध्ये २,४१९ तरुणांना नोकरी मिळाली.
Tata Motors and 21 other companies participated in the Kanpur job fair, where 343 candidates were selected

Tata Motors and 21 other companies participated in the Kanpur job fair, where 343 candidates were selected

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांमध्ये बुधवारी (१८ नोव्हेंबर) दोन वेगवेगळे चित्र पाहायला मिळाले. कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर येथे २,०३९ रिक्त पदांसाठी आयोजित मेळाव्यात केवळ ५७६ उमेदवार सहभागी झाले. त्यापैकी ३४३ जणांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. उमेदवारांच्या कमतरतेमुळे तब्बल १,६९६ पदे रिक्त राहिली. दुसरीकडे, प्रयागराजमध्ये आयोजित रोजगार महोत्सवात २,४१९ तरुणांची निवड करण्यात आली.

Loading content, please wait...