UP Election Result: उत्तर प्रदेशात धक्कादायक निकालाचं खरं कारण आलं समोर...नोटा कसं ठरलं गेम चेंजर?

UP Election Result: NOTA बटण दाबणाऱ्या मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला मतदान केले असते तर या जागांवर होणाऱ्या निवडणुकीचा निकाल बदलू शकला असता.
Uttar Pradesh Lok Sabha Election
Uttar Pradesh Lok Sabha Electionesakal

UP Election Result: उत्तर प्रदेशात आश्चर्यकारक निकालाचे खर कारण आता समोर आलं आहे. उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत अनेक प्रकारे धक्कादायक होते. भाजपला मोठा फटका बसल तर समाजवादी पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. नोटा मतदानाचा देखील भाजपला फटका बसला. यामध्ये अनेक ठिकाणी असे उमेदवार होते ज्यांना जिंकून येण्यासाठी लागणाऱ्या मतदानापेक्षा नोटाला अधिक मते पडली.

NOTA बटण दाबणाऱ्या मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला मतदान केले असते तर या जागांवर होणाऱ्या निवडणुकीचा निकाल बदलू शकला असता. राज्यात लोकसभेच्या पाच जागा अशा होत्या जिथे कोणत्याही उमेदवाराच्या विजयाचे अंतर NOTA ला मिळालेल्या मतांपेक्षा कमी होते.

धौरहरा लोकसभेत विजयाचे अंतर 4449 होते तर नोटाला 7144 मते पडली. या जागेवरून समाजवादी पक्षाचे आनंद भदौरिया विजयी झाले आहेत. फारुखाबाद लोकसभेत विजयाचे अंतर 2678 होते, तर NOTA वर 4365 मते पडली असून या जागेवरून भाजपचे मुकेश राजपूत विजयी झाले आहेत. हमीरपूर लोकसभेत विजयाचे अंतर 2629 होते, तर NOTA वर 13453 मते पडली होती.

फुलपूर लोकसभा मतदारसंघात विजयाचे अंतर 4332 होते, तर नोटाला 5460 मते मिळाली. या जागेवरून भाजपचे प्रवीण पेटल विजयी झाले.  सलेमपूर लोकसभा मतदारसंघात विजयासाठी 3573 मतांचे अंतर होते. याठिकाणी नोटाला 7549 मते पडली.

Uttar Pradesh Lok Sabha Election
Lok Sabha Result: वय-25 वर्षे, पद-खासदार... हे आहेत सर्वात तरुण MP, राजकीय धुरंधरांचा केला पराभव

उत्तर प्रदेशात अशा अनेत जागा आहेत जिथे 10 हजारापेक्षा जास्त मतदान नोटाला झाले आहे.

  1. रॉबर्टगंज - 19,032

  2. झाशी – 15,302

  3. मिर्झापूर – 15,049

  4. कैसरगंज-14,887

  5. हमीरपूर - 13,453

  6. बांदा - 13,235

  7. कौशांबी – 12,967

  8. बहराइच – 12964

  9. जालौन – 11154

  10. गौतम बुद्ध नगर - 10,324

  11. देवरिया - 10,212

  12. भदोही – 11,229

ईव्हीएम मशिनमधील नोटा बटणाचा अर्थ 'नन ऑफ द अबोव्ह' म्हणजेच यापैकी काहीही नाही. जेव्हा मतदार कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार पसंत करत नाही आणि दुसऱ्याला मत देऊ इच्छितो तेव्हा निवडणुकीच्या वेळी NOTA बटण दाबले जाते. पण पर्याय नसल्यामुळे ते NOTA दाबत आहेत. 

Uttar Pradesh Lok Sabha Election
Kolhapur Lok Sabha : 'या' प्रमुख नेत्यांच्या गावांतच मंडलिक पिछाडीवर; कारखाना संचालकांच्या गावांतही मताधिक्य नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com