महिलेला वाचवण्यासाठी ११ ते १२ वर्षांच्या मुलींनी तलावात घेतल्या उड्या, महिला वाचली पण ४ मुलींचा मृत्यू

Uttar Pradesh News in Marathi: पोलिसांच्या माहितीनुसार, यमुना एक्सप्रेसवे इंटरचेंजजवळील वॉटर हार्वेस्टिंग प्लांटच्या एका तलावाजवळ लाकडं गोळा करण्यासाठी एक महिला आली होती. तिच्यासोबत आठ मुली तिथे होत्या.
Uttar Pradesh News
Uttar Pradesh Newsesakal
Updated on

आग्रा येथील थाना खंदौली परिसरातील यमुना एक्सप्रेसवे इंटरचेंजजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसवे इंटरचेंजजवळच्या एका तलावात आठ मुलं आणि एक महिला डूबली. या सर्वांना बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहितीप्रमाणे, महिला आणि चार मुलांना वाचवण्यात आले, मात्र चार मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, यमुना एक्सप्रेसवे इंटरचेंजजवळील वॉटर हार्वेस्टिंग प्लांटच्या एका तलावाजवळ लाकडं गोळा करण्यासाठी एक महिला आली होती. तिच्यासोबत आठ मुली तिथे होत्या. यावेळी अचानक महिलाचा पाय घसरला आणि ती तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी मुलीही तलावात उतरल्या आणि पाणी खोल असल्याने डूबू लागल्या. या दुर्घटनेत हरदिल, नेहा, अनुराधा आणि शालिनी या मुलींचा मृत्यू झाला.

यमुना एक्सप्रेसवे ऑथोरिटीने तयार केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग तलावात सुरक्षेसाठी कोणतीही बॅरिकॅडींग नव्हती. आरडाओरड ऐकून पोलीस, होमगार्ड आणि लोक तिथे जमा झाले. होमगार्ड मुकेश चौहान आणि काही लोकांनी लगेच तलावात उडी मारली आणि महिला व चार मुलांना बाहेर काढले. मात्र चार मुलींची स्थिती खूपच नाजूक होती, त्यापैकी एक मुलीने जागीच प्राण सोडले आणि बाकी तिघींना एस.एन. मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, पण तिथेही त्या तिघींचा मृत्यू झाला.

Uttar Pradesh News
Hathras Stampede: 'त्यामुळे लोक बेशुद्ध होत गेले अन् गुदमरून मृत्यूमुखी पडले...', भोले बाबाच्या वकिलाचा नवा दावा

महिलेला वाचवताना मुलींचा मृत्यू-

खंदौली थान्याचे पोलीस निरीक्षक राकेश चौहान यांनी सांगितले की सकाळी सुमारे 10.30 वाजता ही घटना घडली. त्यांना माहिती मिळाल्यावर ते त्वरित घटनास्थळी गेले. सर्वांनी मिळून त्वरित बचावकार्य केले, ज्यात एक महिला आणि चार मुलांना वाचवण्यात आले, मात्र चार मुलींची प्रकृती खूपच खराब होती आणि त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला. या मुलींची वय 11 ते 12 वर्षे होती.

Uttar Pradesh News
Worli Hit And Run: हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ समोर; पाहा अपघाताआधी काय घडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.