हिंदू देवतांचे फोटो असलेल्या कागदातून चिकनची विक्री; तालिब हुसेनला अटक

Hindu God
Hindu Godesakal
Summary

हुसैन नावाचा व्यक्ती त्याच्या हॉटेलमध्ये देवतांची चित्रं असलेल्या कागदातून चिकन विकत होता.

उत्तर प्रदेशातील संभल (Uttar Pradesh Sambhal) इथं हिंदू देवतांची (Hindu God) चित्रं असलेल्या कागदातून चिकन विकून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय.

Hindu God
VIDEO : पंजाबी गायकाच्या हत्येनंतर मारेकऱ्यांचं जोरदार सेलिब्रेशन

पोलिसांनी (Uttar Pradesh Police) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला सांगितलं की, ही घटना रविवारी उघडकीस आलीय. काही लोकांनी तक्रार केली की, तालिब हुसेन (Talib Hussein) त्याच्या दुकानातून हिंदू देवतांचं चित्र असलेल्या कागदातून चिकन विकत आहे, त्यामुळं आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पोलिसांचं पथक हुसेनच्या दुकानात पोहोचलं, तेव्हा हुसैननं त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला.

Hindu God
चिमुरड्याच्या पाठीवर लाकूड तुटलं तरी शिक्षकाचा राग शांत झाला नाही, तो मारतंच राहिला!

वरिष्ठ उपनिरीक्षक अजय कुमार यांनी दाखल केलेल्या अहवालाचा हवाला देत पोलिस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी सांगितलं की, संभल कोतवाली भागात तालिब हुसैन नावाचा एक व्यक्ती त्याच्या हॉटेलमध्ये देवतांची चित्रं असलेल्या कागदातून (वृत्तपत्र) चिकन विकत होता. काही लोकांनी याबाबत तक्रार केली होती, त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. तपासादरम्यान तालिबनं पोलिस पथकावर चाकूनं हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. रविवारी रात्री उशिरा या प्रकरणी तालिब विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153 'अ' (शत्रुत्व पसरवणं), 295 अ (कोणत्याही धर्माचा अपमान करण्याच्या हेतूनं प्रार्थनास्थळाचं नुकसान करणं किंवा अपवित्र करणं) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, घटनास्थळावरून देवतांची छायाचित्रं, हल्ल्यात वापरलेला चाकू आणि वर्तमानपत्रांच्या प्रती जप्त करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com