

Uttar Pradesh has introduced revised minimum wage rates for eligible workers from October 1, 2026
esakal
उत्तर प्रदेश : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ केली आहे. कामगार विभागाने ७४ अनुसूचित नियोजनांसाठी परिवर्तनीय महागाई भत्त्याचे (VDA) सुधारित दर निश्चित केले आहेत. त्यानुसार कामगारांच्या मासिक वेतनात १७४.२५ रुपयांपासून २३८.३९ रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. हे नवे दर १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात आले असून ३१ मार्च २०२७ पर्यंत प्रभावी राहतील.