esakal | ICU बेड मिळाला नाही! योगी सरकारमधील आमदाराचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

keshar singh gangwar

उत्तर प्रदेशातील बरेलीच्या नवाबगंज मतदारसंघाचे भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचे आज कोरोनाने निधन झाले आहे

ICU बेड मिळाला नाही! योगी सरकारमधील आमदाराचा मृत्यू
sakal_logo
By
टीम ईसकाळ

बरेली- उत्तर प्रदेशातील बरेलीच्या नवाबगंज मतदारसंघाचे भाजप आमदार केसर सिंह गंगवार यांचे आज कोरोनाने निधन झाले आहे. कोरोनामुळे निधन झालेले केसर सिंह गंगवार यूपीतील भाजपचे तिसरे आमदार ठरले आहेत. 18 एप्रिल रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सुरुवातीला राममूर्ती मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. याआधी भाजपचे आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडामध्ये उपचार सुरु असताना केसर सिंह यांचे निधन झाले. राममूर्ती मेडिकल कॉलेजमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना नोएडामध्ये आणण्यात आले होते. पण, त्यांचा जीव वाचू शकलेला नाही. कोविडच्या दुसऱ्या लाटेत भाजपच्या 3 आमदारांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे केसर सिंह यांना 24 तास आयसीयू बेड मिळाला नव्हता. त्यानंतर त्यांना नोएडामध्ये दाखल करण्यात आले होत्या. यूपीचे भाजप अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी यावर दु:ख व्यक्त केले आहे.

हेही वाचा: यूपीत कोरोनाचा उद्रेक; योगी सरकार हायकोर्टाचंही ऐकेना

केसर सिंह गंगवार यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात आरोग्य सुविधा पुरेशा असल्याचं तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलं होतं. पण, त्यांच्याच आमदाराला आयसीयू बेड मिळत नसेल, तर परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे योगी सरकार कितीही नाकारत असलं तरी उत्तर प्रदेशमधील परिस्थिती गंभीर बनल्याचं दिसत आहे.