

UP’s Mukhyamantri Bal Seva Yojana Gives Orphaned and Rescued Children ₹2,500 Monthly Support and Education Aid
esakal
पालकांचे छत्र हरपलेल्या आणि बालमजुरी किंवा भिक्षावृत्तीतून मुक्त केलेल्या बालकांसाठी उत्तर प्रदेश सरकारची 'मुख्यमंत्री बाल सेवा योजना (सामान्य)' आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र मुलांना १८ वर्षांपर्यंत दरमहा २,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर १८ वर्षांनंतर पदवी किंवा डिप्लोमा शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना २३ वर्षांपर्यंत दरमहा २,५०० रुपये शिक्षणासाठी दिले जात आहेत. सध्या राज्यातील १,०३,६११ बालके या योजनेचा लाभ घेत आहेत.