up police moustache maintenance allowance
sakal
देश
Police Moustache: पोलीस दलात मिशी ठेवली तर मिळतो भत्ता! आजही ब्रिटिश कालीन जुनी परंपरा कायम, काय आहे कारण?
उत्तर प्रदेश पोलीस दलात व्यवस्थित आणि घट्ट मिशा राखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला शासनाकडून विशेष 'मिशा भत्ता' देण्याची तरतूद.
उत्तर प्रदेश पोलीस दलात एकेकाळी पिळदार आणि रुबाबदार मिशा हे पोलीस कर्मचाऱ्याच्या जरबबेचे आणि अधिकाराचे प्रतीक मानले जात असे. ब्रिटीश काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही पोलीस विभागात जिवंत आहे.
विशेष म्हणजे, नियमानुसार व्यवस्थित आणि घट्ट मिशा राखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला शासनाकडून विशेष 'मिशा भत्ता' देण्याची तरतूद आहे. मात्र, बदलत्या काळानुसार पोलिसांमधील हा मिशांचा रुबाब आता कमी होताना दिसत आहे.
