UP : पंतप्रधान करणार मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी

पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये विकास कामांचा धडाका सुरू केला आहे.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशTeam eSakal

क्रीडा शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेरठसाठी (Meerut) आजचा दिवस खास असणार आहे. आज मेरठमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची (Major Dhyan Chand Sports University) पायाभरणी होणार आहे. यावेळी पंतप्रधान भगवान आघडनाथ मंदीर आणि हुतात्मा स्मारकालाही भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सध्या उत्तर प्रदेशमध्ये विकास कामांचा धडाका सुरू केला आहे.

उत्तर प्रदेश
‘एनडीआरएफ’ निधीमार्फत सहा राज्यांना अर्थसाह्य

मेरठमधील सरधना शहरातील सलावा आणि कैली गावांच्या परिसरात हे विद्यापीठ तयार करण्यासाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. पायाभरणीसाठी येणारे पंतप्रधान मोदी मेरठमध्ये तीन तास थांबणार आहेत. दुपारी 1 ते 2.30 या वेळेत सलावा येथील क्रीडा विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधान 32 खेळाडूंशीही संवाद साधणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2.45 वाजता सलवा येथील हेलिपॅडवरून दिल्लीला रवाना होतील.

उत्तर प्रदेश
Chopper Crash : चूक इथं झाली? लवकरच समोर येणार अहवाल

क्रीडा विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, या कार्यक्रमात राज्यातील 75 जिल्ह्यांतील 16 हजार 850 खेळाडूंना आमंत्रण देण्यात आलं आहे. कार्यक्रम स्थाळाला स्टेडियमसारखं स्वरूप देण्यात आलं आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह मुझफ्फरनगर आणि मेरठचे खासदार, आमदार आणि लाभार्थी तसेच जवळपासच्या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com