Accused Talib
sakal
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सराईत गुन्हेगार तालिब ऊर्फ आझम खां याला पोलिसांनी चकमकीत कंठस्नान घातले आहे.
रविवारी उशिरा रात्री सुलतानपूर जिल्ह्यातील लंभुआ परिसरात लखीमपूर खेरी आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत हा एक लाखाचा इनामी बदमाश ठार झाला. तालिबविरुद्ध खुनाचा प्रयत्न, लूटमार आणि बलात्कारासारखे एकूण १७ गंभीर गुन्हे दाखल होते.