cm yogi adityanath
sakal
देश
कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर प्रदेशात १ जानेवारीपर्यंत शाळांना सुटी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेशात सध्या कडाक्याची थंडी आणि भीषण शीतलहर पसरली आहे.
उत्तर प्रदेशात सध्या कडाक्याची थंडी आणि भीषण शीतलहर पसरली असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व शाळा १ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. हवामान खात्याने राज्यातील सुमारे ४० शहरांमध्ये दाट धुक्याचा इशारा दिला असून काही ठिकाणी तर दृश्यमानता शून्य टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे.
