Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनी युपीत घुमली महाराष्ट्राची लेझिम, १० राज्यांतील २६१ कलाकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांनी कलाकारांना अयोध्या दर्शनाचे विशेष निमंत्रण दिले
up yogi adityanath republic day

up yogi adityanath republic day

esakal

Updated on: 

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे अतिशय सुंदर दर्शन घडले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी देशातील १० विविध राज्यांमधून आलेल्या २६१ लोककलाकारांचा विशेष सन्मान केला. या कलाकारांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आपापल्या राज्यांची संस्कृती आणि लोककला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कलाकारांशी संवाद साधताना सांगितले की, भाषा, वेशभूषा आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांचा 'भाव' एकच आहे, जो भारताला जोडतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com