

Uttar Pradesh:
esakal
देश: उत्तर प्रदेशातील अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी योगी सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ग्रॅच्युइटी वाढीची मागणी अखेर सरकारने मान्य केली असून, या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे.
सोमवारी १६ मार्च रोजी घेतलेल्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील अडीच लाख शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आता माध्यमिक शाळांच्या कर्मचाऱ्यांनाही ही सुविधा मिळणार आहे.