गाझीपूर जिल्ह्यात ट्रकच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृ्त्यू; 10 जणांना चिरडलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Pradesh

गाझीपूर जिल्ह्यात आज (मंगळवार) झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय.

गाझीपूर जिल्ह्यात ट्रकच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृ्त्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझीपूर जिल्ह्यात आज (मंगळवार) झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय. येथील एका झोपडीत घुसलेल्या ट्रकनं 10 जणांना चिरडलं असून या धडकेत अनेक जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान, जखमींना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले आहेत. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला असून ट्रक चालकावर कारवाई करण्याची मागणी केलीय.

दरम्यान, ही घटना मुहम्मदाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील (जि. गाझीपूर) अहिरोली गावातील आहे. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 7 वाजता अहिरोली चटीजवळ एका अनियंत्रित ट्रकनं रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर स्थानिक लोकांच्या मदतीनं इतरांना बाहेर काढून गाझीपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. जिथं उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात काही लोक गंभीर जखमीही झाले आहेत.

हेही वाचा: गुजरातमध्ये सॉ मिलला भीषण आग

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ट्रकच्या अनियंत्रितपणे चालविण्यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आम्ही ट्रक रस्त्यावरून येऊन झोपडीत घुसण्यामागची कारणं शोधत आहोत. या अपघातानंतर स्थानिक लोकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रस्ता अडवून धरलाय असून गावकऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी केलीय. दरम्यान, स्थानिक लोकांनी NH-31 गाझीपूर-भरौली रस्ता रोखून वाहतूक ठप्प केलीय.

हेही वाचा: जगभरातील 50 लाख नागरिकांना कोरोनानं गिळलं

Web Title: Uttar Pradesh Tragic Road Accident In Ghazipur Speeding Truck Entered Hut 10 Crushed 6 People Killed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar Pradesh
go to top