लोकप्रिय मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशात महिलांचे अस्तित्व धोक्यात!

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 September 2020

जातीय आणि धार्मिक हिंसाचारामुळे देशभर कुख्यात झालेल्या उत्तर प्रदेशांत महिलांचे अस्तित्व देखील सुरक्षित नसल्याचे आढळून आले आहे.

नवी दिल्ली-  जातीय आणि धार्मिक हिंसाचारामुळे देशभर कुख्यात झालेल्या उत्तर प्रदेशांत महिलांचे अस्तित्व देखील सुरक्षित नसल्याचे आढळून आले आहे. एकट्या यूपीमध्ये २०१६ ते २०१९ या काळामध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या २० टक्क्यांनी वाढल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून दिसून येते. उत्तरप्रदेश हे देशातील सर्वांत असुरक्षित राज्य असल्याचे असल्याचे एनसीआरबीचा अहवाल सांगतो, यूपीपाठोपाठ मध्यप्रदेशातही महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

सहा हजारांच्या घसरणीनंतर, सोन्याच्या दरांत किंचित वाढ

३ लाख ७८ हजार- महिला अत्याचाराची प्रकरणे

५९ हजार ४५५- उत्तरप्रदेश

३५ हजार ४९७- महाराष्ट्र

३० हजार ३९४- प. बंगाल

१६६- आसाम

१४९- दिल्ली

२७.२ टक्के- बलात्कारप्रकरणात शिक्षेचे प्रमाण

८५.३ टक्के- आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण

३१. ९ टक्के- पती, कुटुंबीयांकडून होणारा छळ

२७.६ टक्के- विनयभंगाच्या उद्देशाने हल्ला

(एनसीआरबी २०१८ ची आकडेवारी)

दरम्यान, दरम्यान, नुकतेच उत्तर प्रदेशातील हाथरस इथं सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बलात्कार करणाऱ्या नराधमांनी पीडितेची जीभ कापली होती. याशिवाय जबर मारहाण केली होती. यात तिच्या पाठीचे हाडही मोडले होते. गेल्या आठवड्याभरापासून ती सफदरजंग रुग्णालयात मृत्यूशी लढा देत होती. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh unsafe for women data show