Lakhimpur Violence| शेतकऱ्यांना चिरडलेल्या अपघाताचा व्हिडिओ आला समोर

Lakhimpur Violence| शेतकऱ्यांना चिरडलेल्या अपघाताचा व्हिडिओ आला समोर

Lakhimpur Kheri Violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली. आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून इथली परिस्थिती तणावपूर्ण आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. शेतकऱ्यांना चिरडलेल्या दुर्देवी घटनाचा व्हिडिओ पाहून मन सून्न होतेय. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विट खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर पाठीमागून जीप येऊन उडवताना दिसत आहे. एक शेतकरी तर गाडीच्या बोनटवर लटकलेला दिसत आहे. गाडीचा वेगही प्रचंड असल्यामुळे त्याखाली शेतकरी चिरडले गेले. हूटर वाजवत असताना मागून येणाऱ्या जीपने अनेकांना चिरडले. जीपच्या मागे एक एसयूव्ही देखील आली. भरधाव जीपने धडक दिल्याने अनेक लोक जखमी झाले. अचानक घडलेल्या घटनेने घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर सर्वांनी जखमींना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेत्यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर पोस्ट केला आहे. प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणताही माहिती अथवा कारवाई कऱण्यात आली नाही. सोमवारी शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर 15 जणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलेला आहे.

काय आहे प्रकरण?

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी लखीमपूर खेरी येथे आले होते. त्यानंतर ते मिश्रा यांचे मूळ गाव भवानीपूर येथे जाणार होते. त्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच कृषी कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन करणारे शेतकरी ते उतरणार असलेल्या हेलिपॅडपाशी सकाळी आठ वाजताच पोहोचले. त्यांनी हेलिपॅडवर ठिय्या दिला व त्याचा ताबा घेतला. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता मोटारीने मिश्रा आणि मौर्य यांचा ताफा तिकोनिया चौकातून गेला, तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. हे पाहताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावली. या घटनेत चार शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते. तर चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com