esakal | कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्यांची काळजी घेणार योगी सरकार
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi-Adityanath

कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्यांची काळजी घेणार योगी सरकार

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

लखनऊ- उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात कोविडमुळे ज्या मुलांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशांचे पालन-पोषणसह अन्य प्रकारची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी महिला आणि बालविकास विभागाला तत्काळ विस्तृत कार्ययोजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील अनेक मुलांना आपल्या आई-वडिलांना गमवावं लागलंय. त्यामुळे योगी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. (uttar pradesh yogi aadityanth will take care child who lost parents)

यूपीत संक्रमण दर देशात सर्वाधिक कमी

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यातअशी प्रकरणे समोर आलेत, ज्यात कोरोना विषाणूमुळे अनेकांना आपल्या आई-वडिलांना गमवावं लागलंय. अशा मुलांची काळजी घेणारं आता कोणीही नाही. अशात योगी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी कर्फ्यू लावण्यात आलाय, ट्रेंसिस आणि टेस्टिंगमुळे राज्यातील पॉझिटिव्हिटी रेट देशात सर्वात कमी आहे. इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशची स्थिती चांगली आहे, असं म्हणावं लागेल. 10 ते 16 मेदरम्यान अनेक राज्यातील पॉझिटिव्हिटी रेट 25 ते 30 टक्के होता, याचदरम्यान उत्तर प्रदेशातील पॉझिटिव्हिटी रेट 6.67 टक्के होता.

हेही वाचा: कोरोनामुळे UP मधील मंत्र्याचं निधन

उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 8,727 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या 24 एप्रिलला 38,055 होती. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 21,108 कोरोना संक्रमित रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 36 हजार 342 आहे, 30 एप्रिलला हीच संख्या 3,10,783 होती. यातील 99 हजार 891 होम आयसोलेशनमध्ये आहेत.

loading image
go to top