
उत्तर प्रदेशातील महोबा येथे ऑनलाइन गेम पबजीमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका विवाहित महिलेने पबजी खेळताना लुधियाना येथील तरुणाच्या प्रेमात पडून आपल्या पतीला ५५ तुकड्यांत कापून ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे, तर तिने आपल्या दीड वर्षांच्या मुलालाही त्रास दिला केली. अखेर, पतीने स्वतःच्या आणि मुलाच्या जीविताच्या रक्षणासाठी तिला तिच्या प्रेमीसोबत जाऊ दिले.